गणेशाची आरती आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

 आपल्या सर्वांचं लाडकं दैवत असलेल्या गणपती बाप्पाची दर वर्षी गणेश चतुर्थीला आपण आतुरतेने वाट पाहत असतो. त्याची आरती त्याचा जयघोष आणि खूप सारी धमाल. मोदकांचा आस्वाद आणि सर्वांची सोबत हीच तर आपल्या बापाच्या आगमनाची कमाल. सगळीकडेच आनंदी आनंद. 


या आनंदाच्या दिवशी तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा  देणारे काही स्टेटस तेही मराठीत तुमच्यासाठी.तुम्हाला नक्की आवडतील. तेव्हा तुमच्या लोकांना wish करा, msg करा किंवा status ठेवा आणि अनोख्या पद्धतीने गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्या.

गणपती बाप्पाची आरती:


गणपती-बाप्पाची-आरती


सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

गणेश चतुर्थी संदेश:

🌺गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे

लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास

अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…

सर्व गणेश भक्तांना

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺


Ganesh-chaturthi-quotes-in-Marathi


मोदकांचा केला प्रसाद 

केला लाल फुलांचा हार 

मखर झाले नटून तयार 

आले वाजत गाजत बाप्पा

गुलाल फुले अक्षता उधळे 

बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे 

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Ganesh-chaturthi-status-in-Marathi

बाप्पाच्या आगमनला

सजली सर्व धरती 

नसानसात भरली स्फुर्ती 

आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा!


Ganesh-chaturthi-quotes-in-Marathi

 तुमच्या आयुष्यातला आनंद,

गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो,

आयुष्य सोंडे इतके लांब असो,

क्षण मोदका इतके गोड असो,

गणेश चतुर्थीच्या

हार्दिक शुभेच्छा!


Ganesh-chaturthi-quotes-in-Marathi

कैलासाहून बाप्पा तुझी सुटली

कारे स्वारी वाटेत कुठे राहू

नकोस सरळ ये घरी…🌺


Ganesh-chaturthi-quotes-in-Marathi

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया.. 


Ganesh-chaturthi-quotes-in-Marathi

तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना!

Ganesh-chaturthi-quotes-in-Marathi

वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा!
सर्वांना
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.


Ganesh-chaturthi-quotes-in-Marathi

तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना!


Ganesh-chaturthi-quotes-in-Marathi

 श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….

गणाधिशाची स्वारी आली.

Ganesh-chaturthi-quotes-in-Marathi

बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती 
नसानसात भरली स्फुर्ती 
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Ganesh-chaturthi-quotes-in-Marathi

बाप्पाच्या उदराइतका आनंद तुमच्या आयुष्यात विशाल असो 
उंदराइतक्या लहान अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागो 
बाप्पाच्या सोंडेप्रमाणे तुम्हाला आयुष्य लांबसडक मिळो 
प्रत्येक क्षण प्रसादाच्या मोदकाप्रमाणे गोड असो 
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

Ganesh-chaturthi-quotes-in-Marathi






Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post