केसांची काळजी कशी घ्यावी: घरगुती उपाय

 असंतुलित आहार, पुरेशी झोप न मिळणे, सततचा तणाव अशा अनेक गोष्टी केसांच्या आरोग्यावर परिणाम करत असतात. केस गळणे, केस पांढरे पडणे, केसांची पूर्ण वाढ न होणे अशा अनेक समस्या अनेक कारणांमुळे उद्भवत असतात. काळे व घनदाट केस असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु केस गळती सारख्या अनेक समस्यांना स्त्री व पुरुष या दोघांनाही सामोरे जावे लागते. रोजची धावपळ, प्रदूषण, मद्यपान तसेच केसांची सततची गुंतंतागुंतीची हेअरस्टाइल, केस कलरींग अशा अनेक गोष्टी केसांच्या आरोग्याशी निगडित आहेत. सुंदर केस आपल्या व्यक्तिमत्वावर खुप खोलवर प्रभाव टाकत असतात त्यामुळे त्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.


केसांची काळजी घेण्याच्या टिप्स आणि ट्रिक्स


केसांची निगा कशी राखावी?

. रात्री झोपताना किंवा शाम्पू करण्याच्या अर्धा ते पाऊण तास आधी  तेलाने डोक्याची मसाज करावी. सहसा मसाजसाठी कोमट तेलाचा वापर करावा.


२. केस स्वच्छ धुताना गुंता होणार नाही याची काळजी घ्यावी.


३. कंडिशनरचा वापर करताना तो स्कॅल्पला न लागता फक्त केसांना लावावा  व थोडा वेळ ठेवून साध्या पाण्याने केस धुवावेत.


४. डोके धुताना गरम पाण्याचा वापर करणे टाळावे.


५. केस सुकविण्यासाठी ते कॉटनच्या कापडात गुंडाळून ठेवावे व थोड्या वेळाने हलक्या हाताने पुसून घ्यावे. 


६. केस नैसर्गिकरीत्या सुकून द्यावे कोणत्याही उपरणांचा वापर केस सुकवण्यासाठी करू नये.


७. आठवड्यातून किमान दोनदा केस धुतले पाहिजे जेणेकरून केस स्वच्छ राहतात.


८. केसांना चकाकी आणण्यासाठी घरगुती मास्कचा वापर करू शकता.


९. आहारात आवळा, लिंबू, अळशी, शिकेकाई अश्या व्हिटॅमिन सी व ओमेगायुक्त पदार्थांचा वापर करावा.


१०. तीन ते चार महिन्यांनंतर ऐकदा तरी केस ट्रिम करावेत जेणेकरून केसांना फाटे फुटण्यासारख्या समस्यांपासून दूर ठेवता येते.


११. रात्री झोपताना केसाचा गुंता होऊ नये म्हणून त्यांची वेणी घालावी.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 

मालिशसाठी कोणते तेल वापरावे?

खोबरेल तेल सहसा घरात उपलब्ध असते. तेल थोडेसे कोमट करून त्यात येरंडतेल व व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिक्स करून डोक्याला हलक्या हाताने मसाज करावी. मसाज केल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारते तसेच केसांचे मूळ घट्ट होण्यास मदत मिळते.केस वाढीसाठी येरांडतेल व व्हिटॅमिन ई खुप उपयुक्त आहेत. डोक्याला रात्री मालिश केल्यास झोप देखिल चांगली लागते. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा डोक्याला मसाज द्यावी. जर तुमचे केस रुक्ष किंवा ड्राय झाली असतील तर वरील प्रोसेस नक्की करुन पहा.


केसांना तेल लावण्याची पद्धत सांगताना मुलगी
                 तेल मालिश करण्याची योग्य पद्धत 


बऱ्याचदा असे पाहण्यात आले आहे की लोक केस धुतल्यानंतर केसांना तेल लावतात पण तसे केल्याने केसांवर धुळ जमा होते व खाज सुटण्यासारख्या समस्या उद्भवतात.

केसांना चकाकी यावी यासाठी काय करावे?

रुक्ष व फाटे फुटलेले केस कोणालाच आवडत नाही त्यामूळे केसांना चकाकी आणण्यासाठी घरगुती तयार केलेला हेअर मास्क वापरू शकता.

Girl applying hair mask
                  केसांना चकाकी यावी केस गळती थांबावी यासाठी केसांना लेप लावण्याची पद्धत 

कोंडा व केस गळती सारख्या समस्यांवर उपाय:

केसातील कोरडेपणा, प्रदूषण, ताण तणाव, असंतुलित आहार अशा अनेक कारणामुळे केस गळती होत असते. केसांना चकाकी आणण्यासोबतच कोंडा व केस गळती सारख्या समस्यांवर घरगुती उपाय करणे सहज शक्य आहे. शिकेकाई कोरफड तसेच जवस असे घरगुती जिन्नस केस वाढीमध्ये व केसांची काळजी घेण्यामध्ये महत्त्वाचा भाग घेतात.

तुरटी:

तुरटीचे अनेक फायदे आहेत जसेकी त्वचेचे आरोग्य चांगले राखणे,
अंगाला घामाचा वास येत असेल किंवा दात दुखत असेल असे अनेक समस्यांवर तुरटी अत्यंत लाभकारी आहे. त्याचप्रमाणे जर केसांमध्ये कोंडा झाला असेल तर पाण्यामध्ये तुरटी मिसळून त्यांनी केस धुवावेत.

कोरफड:

कोरफड ही अशी वनस्पती आहे जी सहसा प्रत्येकाच्या घरी सहजरीत्या उपलब्ध असते नसल्यास कोरफडचे रोप अवश्य लावा. कोरफड ही आयुर्वेदिक रित्या उपयुक्त वनस्पती आहे.

कोरफडचा गर व मेथा दाणे रात्रभर भिजत ठेवावें व त्यांनतर त्याचा लेप केसांना लावावा. ही क्रिया आठवडाभर केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या केसांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक आली आहे तसेच कोंडा देखील दूर झाला आहे व केस गळतीचे प्रमाण देखील कमी झाले आहे. सहनशीलता व सातत्य हा कानमंत्र केसांची काळजी घेताना खुप महत्त्वाचा ठरतो.

त्याचप्रमाणे अळशी देखील उकळून त्याचा लेप केसांना लावू शकता. अळशी म्हणजे जवस ज्याला इंग्रजीमध्ये Flax seeds असे म्हंटले जाते.

अळशी चा वापर करुन लेप किंवा हेअर मास्क तयार करण्याची कृती:


१. दोन कप पाण्यात दोन छोटे चमचे जवस (अळशी) टाकून उकली येऊ द्यावी.

२. चमच्याने ढवळत राहावे थोड्या वेळाने पाण्याला चिकटपणा येतो व पाण्याचा रंग देखील बदलतो.

३. मिश्रण थोडे गाढे झाल्यानंतर गॅस फ्लेम बंद करावी.

४. मिश्रण थोडे कोमट झाल्यानंतर स्वच्छ कापडाने गाळून घ्यावे. थोडासा घट्ट व चिवट असा लेप तयार आहे.

Flax-seeds-(जवस)in-Bowl-in-and-spoon
                                                                जवस(अळशी)


 आठवडाभर पुरेल इतका लेप अधिक तयार करुन तो फ्रीज मध्ये ठेवू शकता. लेप लावताना तो केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत लावावा.  ऐक ते दोन तासांनी केस स्वच्छ धुवावेत. केस धुताना शाम्पू किंवा साबणाचा वापर करू नये. 

आठवड्याभरात केसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. केसांना चकाकी किंवा चमक आलेली दिसून येईल. ज्याचे केस ड्राय आहेत अशा व्यक्तींनी तर ही कृती नक्की करुन पहावी.

केस कसे धुवावेत?

मुलगी केस धुताना केस कसे धुवावेत
                                केस धुण्याची योग्य पद्धत

केस धुताना त्यांचा गुंता होणार नाही याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. केस धुण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाम्पूचा वापर करू शकता. डोक्यात कोंडा असल्यास अँटीडँड्रफ शाम्पू चा वापर करावा. मगामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यात शाम्पू मिक्स करावा. केस पुढे घेऊन त्यावर हे शाम्पूचे पाणी टाकावे. केसांचा गुंता होऊन देता हाताने माथा पासून ते केसांच्या  टोकापर्यंत वरून खालच्या दिशेने हाताने केस धुवावेत जेणेकरून केस एकमेकांत गुंतत नाही.
बोटाने माथ्याला व्यवस्थितपणे स्वच्छ करावे व थोडेसे कोमट पाण्याने केस धुऊन काढावे. केसांमध्ये शाम्पूचा फेस राहणार नाही याची काळजी घ्यावी. केसातील जेवढे निघेल तेवढे पाणी काढावे व त्यानंतर केसांवर कंडिशनर चा वापर करावा जेणेकरून केस मऊ व सुटसुटीत होतात.

केस विंचरताना कोणती काळजी घ्यावी?

केस विंचरण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ते तुटतात. केस विसरण्यासाठी त्यांचे दोन भागांमध्ये विभाजन करावे व मुळापासून टोकापर्यंत हलक्या हाताने कंगवा फिरवावा.
यासाठी मोठ्या दाताच्या कंगव्याचा वापर करावा. केसांमध्ये गुंता असल्यास बोटाने तो आधी मोकळा करून घ्यावा व त्यानंतर केस विचारण्यास सुरुवात करावी.

Girl-combing-her-hair
                        केस विंचरण्याची योग्य पद्धत

 धूळ व प्रदूषण यामुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो त्यामुळे ते कमीत कमी वेळा मोकळे सोडावेत.

आपण काय शिकलात?

केस आपल्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर परिणाम करतात त्यामुळे त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. केस तुटणे किंवा केस गळती होऊ नये यासाठी केस विंचरताना तसेच धुताना गुंता होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आठवड्यातून दोन-तीन वेळा तेलाने चांगली मालिश करून केस धुतले पाहिजे. तीन-चार महिन्यातून एकदा केस कट केल्याने त्यांना फाटे फुटत नाहीत व केस दाट होतात.

माहिती उपयुक्त वाटल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास नक्की कळवावे.....









Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post