आजच्या काळातील रक्षाबंधन।रक्षाबंधन सणाची माहिती आणि संदेश 2023

 दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी 'रक्षाबंधन' हा सण साजरा केला जातो. या सणाला 'राखी पौर्णिमा' असे देखील म्हटले जाते. रक्षाबंधन शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ होतो 'संरक्षण'. आपल्यापेक्षा बलवान अशा व्यक्तीने आपले संरक्षण करावे हा या सणामागचा उद्देश. कोळी बांधवांसाठी देखील हा दिवस खूप महत्त्वाचा असतो याच दिवशी नारळी पौर्णिमा देखील असते. 


Rakshabandhan-sanachi-mahiti cha-cha-cha rathi


यावर्षी रक्षाबंधन हा सण 30 ऑगस्ट 2023 या दिवशी आला आहे. हा सण  साजरा करण्यास केव्हा सुरु रीवात झाली याचा पुरावा नसला तरी पुरातन काळापासून मनोभावे हा सण प्रत्येक भाऊ बहिण साजरा करतात. हा सण म्हणजे भावा बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतिक आहे.

अधिक माहिती: केसांची काळजी कशी घ्यावी?

रक्षाबंधन सणाची कथा 

असे म्हटले जाते की भगवान विष्णू ने जेव्हा वामन अवतार घेतला होता व राजा बळी ला पाताळात पाठवले होते तेव्हा भक्त म्हणून राजा बळीने त्यांना नेहमी आपल्या नजरेसमोर राहण्याचा आशीर्वाद मागितला होता अशा वेळेस भगवान विष्णू यांना राजा बळी सोबत पाताळात राहावे लागले. परंतु यामुळे देवी लक्ष्मी व भगवान विष्णू यांची ताटातूट झाली. नारद मुनींनी देवी लक्ष्मी यांना राजा बळी यास भाऊ मानण्याचा सल्ला दिला. 

देवी लक्ष्मी जेव्हा उदास होऊन पाताळात गेल्या तेव्हा राजा बळीने त्यांना त्यांच्या उदासीन तेचे कारण विचारले तेव्हा देवी लक्ष्मी यांनी सांगितले की त्यांना कोणी भाऊ नाही तेव्हा राजा बळीने देवी लक्ष्मी यांना आपली बहीण मानले. जेव्हा भेट वस्तू म्हणून त्यांनी देवी लक्ष्मी यांना विचारले तेव्हा देवी लक्ष्मींनी भगवान विष्णूची मागणी केली. राजा बळीने देखील त्यांना भगवान विष्णू सुपूर्त केले व तेव्हापासून बहिण भावाच्या नात्याची सुरुवात झाली असे म्हणले जाते.

Rakshabandhan-sanachi-mahiti



आपल्याला माहितीच आहे की भगवान कृष्ण यांनी पांडवांची बायको द्रौपदी हिस आपली बहीण मानले होते. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा द्रौपदीने आपल्या भावाला मदतीचे आवाहन केले. यावेळेस भगवान कृष्ण यांनी वस्त्र पुरवून द्रौपदीचे संरक्षण केले ज्याने बहीण भावाचे नाते अधिकच दृढ बनले.

रक्षाबंधन सणाचा इतिहास

ऐतिहासिक काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या भावा बहिणीच्या नात्याचा पुरावा देतात ज्यामध्ये हिंदू किंवा मुस्लिम असा कोणताच भेद नाही.


रक्षाबंधन सणाचा इतिहास


चित्तोडची राणी कर्मावती हिने बादशाह हुमायुला आपला भाऊ मानले होते. बहादुर शहाणे जेव्हा चित्तोडवर आक्रमण केले तेव्हा एक भाऊ म्हणून बादशाह हुमायु ने आपले कर्तव्य बजावले होते.


दुसरा आलमगीर बादशहा जेव्हा दिल्लीवर राज्य करत होता तेव्हा त्याच्या प्रधानाने त्याचा घात करून खून केला व प्रेत पाण्यात फेकून दिले. एका स्त्रीने हे प्रेत पाहिले व वाहून जाऊ नये म्हणून पाण्याबाहेर काढले एवढेच नव्हे  तर प्रेताला वाली येईपर्यंत ती तेथेच बसून राहिली. बादशहाचे सैनिक व त्याचा मुलगा शहाआलम जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्या स्त्रीचे आभार मानले व शहाआलमने त्या हिंदू स्त्रीला आपली बहीण मानले. दरवर्षी ही स्त्री शहा आलमला राखी बांधत असे. हीच प्रथा पुढे अकबर शहा व बहादुर शहाणे चालू ठेवली.


या दोन्ही गोष्टींवरून ही जाणीव होती की भावा बहिणीचे नाते हे जातीभेदा पलीकडचे आहे. फक्त रक्तानेच कोणी भाऊ बनत नाही तर त्या नात्याची पवित्रता राखल्याने हे नाते अतूट बनते.


रक्षाबंधन सणाचे स्त्रीच्या आयुष्यातील महत्व

रक्षाबंधन हा सण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा सण आहे. विवाहित स्त्रीसाठी हा दिवस अत्यंत अनमोल असतो या दिवशी तिला माहेरी जाता येते व आपल्या आई वडील व भावंडांसोबत चांगले क्षण व्यतीत करता येतात. ती या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते.


या दिवशी बहिण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते, त्याला दीर्घायुष्य लाभावे अशी मनोकामना करते व त्याच्याकडून रक्षण करण्याचे वचन घेते. यासोबत एक आख्यायिका आहे.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।

बहीण राखी बांधताना ही कामना करते की जशी राजा बळीला रक्षासुत्र म्हणुन गुरु शुक्राचार्य यांनी राखी बांधली तशी मी तुला राखी बांधते.


भावासाठी देखील हा दिवस खूप मौल्यवान असतो. राखी बांधल्यानंतर तो आपल्या बहिणीला तिच्या संरक्षणाचे व नेहमी तिच्या सोबत राहण्याचे वचन देतो. त्याच सोबत तिला खुश करण्यासाठी छानशी भेटवस्तू देखील देतो.

आजच्या काळातील रक्षाबंधन

आजच्या काळात जेव्हा स्त्रिया स्वतःला असुरक्षित  मानतात अशा वेळेस या सणाचे महत्त्व अधिकच वाढते. रोजचा दिवस स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराची माहिती घेऊन येतो अशा वेळेस खंबीरपणे उभे राहणाऱ्या आणि संरक्षण देणाऱ्या भावाची खरी गरज आहे.

Rakshabandhan quotes in Marathi



मुळातच समोर येणारी प्रत्येक स्त्री ही आपली बहीण आहे ही भावना जर पुरुषांच्या मनात आली तर कोणतीच स्त्री स्वतःला असुरक्षित मानणार नाही आणि ती मुक्तपणे संचार करू शकेल.

स्त्रीला मानसन्मान देणे तीला आनंदी ठेवणे हादेखील या सनामागचा उद्देश आहे. पुराणात उल्लेख आहे,

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:| यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:|’ 

ज्या समाजामध्ये स्त्रीची पूजा केली जाते तिला मानसन्मान दिला जातो, जीला घरात महत्वाचे स्थान असते अश्या घरातील जन्माला आलेली मुले सुशील व गुणवान होतात आणि जिथे स्त्रीला मान नाही अशा घराची प्रगती कधीच होत नाही. त्यामुळे तीची काळजी आणि संरक्षण ही प्रत्येक भावाची पहिली जबाबदारी असली पाहिजे.

बलात्कार आणि सासुरवास यासारख्या गोष्टींना स्त्री सामोरी जात असते अशावेळी तिला संरक्षण देणारा हात हवा असतो. कधी कधी असे वाटते की स्त्रीने स्वतः इतके बलवान बनावे की तिच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही.

आजच्या काळात पाहिलं तर बहिण देखील भावाची काळजी घेणे आणि संरक्षण करण्याचे काम करते. बरीच भावंडे अशा त्यांच्या कर्तबगार बहिणीला अगदी प्रेमाने राखी बांधतात. वेळेनुसार राखीची व्याख्या बदलत चालली आहे. बरेच प्रांतामध्ये मालकाला राखी बांधली जाते तसेच काही स्त्रिया त्यांच्या नवऱ्याला देखील राखी बांधतात तर राखी बांधण्यामागे उद्देश फक्त एवढाच असतो की समोरच्या व्यक्तीने आपले संरक्षण करावे आणि त्या व्यक्तीला दिघायुष्य लाभो.

रक्षाबंधनच्या दिवशी राखीला खूप महत्त्व असते तो फक्त धागा नाही तर भावा-बहिणीच्या नात्याचा पुरावा आहे. आजकाल मार्केटमध्ये विविध आकाराच्या आणि रंगाच्या सुशोभीत अशा राख्या मिळतात.

इंटरनेटच्या युगामध्ये व्हाट्सअप फेसबुक किंवा इंस्टाग्राम सारख्या सोशियल मीडिया माध्यमातून बहिण भाऊ एकमेकांना शुभेच्छा देतात. भावा बहिणींना जर भेटणे शक्य झाले नाही तरी व्हिडिओ कॉलिंग करून ते आपला दिवस साजरा करतात. यातून आपल्याला हे समजते की भावा बहिणीच्या नात्यांमध्ये जवळीक निर्माण करण्याचे काम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अगदी बखुबिने करतात. 

अशा माझ्या लाडक्या भावासाठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा मराठी मध्ये

आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही भावना व्यक्त करणारा संदेश 

रक्षण कर भावा माझे काळ बदलला आहे
जाता येता रस्त्यावरती घात होत आहे
विश्वास आहे तुझ्यावरती हात माझा सोडणार नाही
वचन दे मला या राखीचा बंध तु कधीच तोडणार नाही.

Rakshabadhan quotes in Marathi


भावाला वडिलांच्या जागी ठेवणाऱ्या बहिणीची भावना 

वडिलांसारखा आधार दिलास 
आईचे प्रेम दिलेस 
मित्र झालास वेळोवेळी 
गुरू बनलास कठीण काळी.
अशीच साथ राहूदे भाऊराया.
रक्षांधनाच्या तुला खुप साऱ्या शुभेच्छा
rakshabandhan sanache massages ani quotes

 खूप मनापासून वाटत होते

तुला राखी बांधायला घरी याव

पण जबाबदाऱ्या एवढ्या आहेत

की डोके वर करून कस पहावं

मनोकामना देवाला तूला उदंड आयुष्य लाभो

अशीच प्रेमळ साथ नेहमी सोबत राहो।

माझ्या भावाला या बहिणीकडून रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..


Rakshabandhan quotes in Marathi


तुझ माझं पटत नाही वाटत सर्व जगाला 

तुझ्याविना करमत नाही हे सांगू तरी कोणाला

खोड्या काढतोस जेव्हा माझ्या

येतो राग थोडा पण शांत आणि उदास चेहरा तुझा पाहवत नाही मला माझ्या या खोडकर भावाला रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 

 


 लहान आहेस माझ्यापेक्षा तरीही बरच कळत तुला. 

मी मोठा की तू मोठी भ्रम  मला

आईची सावली वाटतेस  घेतेस तेव्हा 

माझ्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

Rakshabandhan quotes and massages in Marathi 2023

 

रक्ताच नात नसलं म्हणून काय, झालं 

भावाची प्रत्येक कर्तव्ये तू पार पाडलीस

आयुष्याच्या अनेक चढ उतरात तू भक्कम अशी साथ दिलीस

 तुझे माझे अतूट नाते राखीच्या धाग्यासारखे असेच घट्ट राहो

सुख समृद्धी वैभव आणि उत्तम आरोग्य तुला लाभो

लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

Rakshabandhan quotes and massages in Marathi 2023


 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post